NPL 2016 Messages

आदित्य पाटील
 
NPL 2016 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांचे, खेळाडूंचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन !
ह्या स्पर्धेचा मुख्य हेतु आपल्या शाळेच्या सहअध्यायांना एकत्र आणणे हा आहे. आपण बालवाडीत असताना ज्यांना १० वीत पाहिलं त्यांच्यासोबत उद्या आपण सामना खेळणार आहोत. जुन्या ओळखींना उजाळा देणार आहोत. ह्यातील कित्येक क्षण पुढील अनेक वर्षे आपली साथ देतील.
ह्या स्पर्धेचे नियम बनविणारे आपलेच मित्र आहेत. आपल्यासारखे ते सुद्धा आपल्या व्यावहारिक जीवनात व्यग्र असतात. त्यांनी ह्यातुन वेळ काढुन जे नियम बनविले आहेत ते कदाचित परिपुर्ण नसतील पण त्यांनी सहभागी संघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करुन बनविलेले हे नियम आहेत. ह्यात काही सुधारणेचा वाव दिसला तर आपण ती सुधारणा पुढील वर्षी अमलात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू!

थोडक्यात म्हणजे सामन्याचा आनंद घेण्याच्या इराद्याने उद्या मैदानात उतरा! पंचाचा एखादा निर्णय समजा आपल्या बॅचच्या विरोधात गेला असे आपणास वाटलं तरीही खिलाडूवृत्तीने सामना पुढे चालू ठेवा! आपली ही स्पर्धा अशीच पुढील अनेक वर्षे चालू राहणार आहे. तेव्हा एखाद्या वर्षीच्या कटु घटनांनी हा आठवणींचा अमोल खजाना लुटण्याची संधी गमावू नका!
आणि हो एखादा चौकार अडविण्याच्या नादापायी खरचटवुन किंवा हाडे मोडून घेऊ नकात! ३५ वर्षांपूर्वी बेबीताईच्या लाल औषधाने एका दिवसात बऱ्या होणाऱ्या ह्याच शाळेतील  तुमच्या जखमांना आता कदाचित महिनोंमहिने लागु शकतात लक्षात असु द्यात! त्यामुळे तो चौकार गेला तरी चालेल

चला मग भेटूयात उद्या मैदानावर!

 चिन्मय गवाणकर
आता उरले फक्त १८ तास ..🕐
शनिवार दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजल्या पासून न्यू इंग्लिश स्कूल च्या आवारात रंगणार माजी विद्यार्थ्यांचे क्रिकेट सामने !👏🏻👏🏻
विद्युत प्रकाश झोतात ,आप आपल्या एस एस सी ब्याच चे कलर्स घालून भिडणार १६ संघ ..कोण ठरेल विजेता ? कोण होणार च्याम्पियन ?🤔
सादर करीत आहोत "न्यू  इंग्लिश स्कूल प्रीमियर लीग २०१६ " (एन पी एल )  वर्ष ५ वे
तुम्ही न्यू इंग्लिश स्कूल चे माजी विद्यार्थी असाल तर आपल्या टीम ला चिअर अप करायला सह कुटुंब आपल्या शाळेत या आणि माजी विद्यार्थी नसाल तरी एक सुंदर स्पर्धा पाहण्यासाठी तरी नक्की या 👍🏻
स्पर्धेचे आयोजक :
न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी महासंघ ..एक प्रयत्न सर्वांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा .. एक प्रयत्न सामाजिक जाणीव असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्याची एक मजबूत कार्यकर्ता फळी तयार करण्याचा ..आपल्या शाळेसाठी ,आपल्या वसई साठी एकत्र येउन काही तरी भव्य दिव्य करून दाखविण्याचा ..आम्ही हे व्रत गेले ५ वर्षे घेतले आहे .पुढेही काम करत राहू
आपली उद्या उपस्थिती आणि पाठींबा प्रार्थनीय 🙏🏻

Comments

Popular posts from this blog

Emotional Quotient

A lost comb, Baking Bowl and A Proud City!

2024 - Europe Trip - Part 3 - London